Friday, May 13, 2022

Instruction for Job Seeker

 सर्व उमेदवारांना महत्वाची सूचना

बहुतेक उमेदवार कोणतीही नोकरी पोस्ट झाली कि त्यावर माहिती पूर्ण न घेता आवेदन करत असतात आणि मग तक्रार करतात कि आम्ही सारखं सारखं आवेदन करतो पण आम्हाला क्विक जॉब्स मधून कोणताही प्रतिसाद भेटत नाही , प्रतिसाद न भेटण्याची करणे खालील प्रमाणे आहेत 

कृपया लक्षपूर्वक वाचा 


केलेल्या जॉब पोस्ट ची माहिती व्यवस्थित वाचा जर  तुमची अपेक्षा नोकरी मध्ये दिलेल्या माहितीनुसार योग्य असेल तरच आवेदन करा 

जेणेकरून तुमचा आणि आमचा वेळ वाया जाणार नाही 


१)पगाराची मर्यादा

प्रत्येक कंपनीची पगाराची मर्यादा ठरवलेली असते जसे आपण कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी आपला बजेट बनवतो त्याप्रमाणे , तरीही उमेदवार जास्त पगाराची अपेक्षा असून सुद्धा आवेदन करतात , त्यामुळे त्यांना प्रतिसाद भेटत नाही

२)वयाची मर्यादा

आम्ही जॉब पोस्टिंग मध्ये जर वयाची मर्यादा दिली असेल तर त्यापेक्षा जास्त किंवा कमी वयाचे उमेदवार कंपनी स्वीकारत नाही 


३) तुमचे लोकेशन

कंपनी नेहमी जवळच्या उमेदवारांना प्राध्यान्य देत असते , कारण कधी उशीर झाला तर त्यांना थांबण्यात काही अडचण नसते , तसेच त्यांचा येण्याजाण्याचा खर्च आणि वेळ सुद्धा कमी असतो व त्यामुळे त्यांची पगाराची अपॆक्षा इतरांपेक्षा कमी असण्याची शक्यता असते   त्यामुळे त्यांना मुलाखतीला प्रथम बोलावले जाते , जर त्यामधील कोणता उमेदवाराची निवड झाली तर इतर उमेदवारांना मुलाखतीला बोलावले जात नाही 


४) लिंग

उमेदवार नोकरीसाठी आवेदन करताना तो जॉब मेल साठी आहे कि फिमेल साठी आहे हे सुद्धा न बघता आवेदन करत असतात त्यामुळे तुम्हाला प्रतिसाद भेटत नाही 


५) बायो डेटा मधील तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्या

आजच्या स्पर्धेच्या जगात खाजगी कंपन्यांमध्ये फक्त आवेदन केले कि मुलाखतीसाठी बोलावले जात नाही , तर तुमच्या बायोडाटा मध्ये लिहलेल्या जबाबदाऱ्या 

सुद्धा वाचल्या जातात , कंपनी ला गरज असलेल्या जबाबदाऱ्या तुमच्या बायोडाटा मध्ये उपलब्ध नसल्यास तुम्हाला बायो डेटा नाकारला जातो. 


६) नोटीस कालावधी

नोकरी मिळण्यासाठी नोटीस कालावधी हा सुद्धा महत्वाचा भाग असतो , एखाद्या कंपनीमधील उमेदवार सोडून घेल्यानंतर बहुदा कंपनीला त्याच्या जागी 

लगेच कामाला  सुरवात करणारा उमेदवार हवा असतो , त्यामुळे १ महिना  थांबणे त्यांना अशक्य असते त्यावेळी उमेदवारान आमच्याकडून प्रतिसाद भेटत नाही 

त्यामुळे नोटीस कालावधी आम्ही लिहिल्याप्रमाणे असल्यास फक्त आवेदन करावे , तसे नसताना सुद्धा आवेदन केल्यास आमच्याकडून प्रतिसाद मिळण्याची कोणतीही अपेक्षा करू नये 


धन्यवाद 

टीम 

क्विक जॉब्स प्लेसमेंट